वार्ताहर/ जमखंडी
बागलकोट जिल्हय़ात रविवार दि. 19 रोजी 60 जणांना कोरोना बाधा झाल्याचे आढळून आले असून एकूण बाधित संख्या 689 वर पोहचली आहे. तसेच एकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत जिल्हय़ात बळींची संख्या 30 झाली असल्याचे जिल्हाधिकारी कॅप्टन राजेंद्र यांनी कळविले आहे.
जिल्हय़ात बदामी तालुक्यात 14, जमखंडी 12, बागलकोट 11, मुधोळ 9, इलकल 9, बिळगी 3, हुनगुंद 2 असे 60 जण बाधित आढळून आले. बागलकोट एस. पी. कार्यालयातील 28 वर्षाच्या कर्मचाऱयाला तर बिळगी येथील अग्निशामक दलातील 34 व 38 वर्षाच्या कर्मचाऱयाला बाधा झाली. बदामी तालुक्यातील केरुर पोलीस ठाण्यातील 45 व 30 वर्षाच्या पोलिसांना बाधा झाली आहे. मुधोळ तालुक्यातील महालिंगनूर येथील 72 वर्षाच्या वृद्धाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला तर बागलकोट येथील 73 वर्षाच्या महिलेचे पण निधन झाले असून महिलेचे स्वॅब प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहे.
अद्याप 2865 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. 20506 व्यक्तींचे नमुने आतापर्यंत पाठविण्यात आले त्यापैकी 16845 निगेटीव्ह, 689 पॉझिटीव्ह, 30 जणांचा बळी गेला आहे.