ऑनलाईन टीम / जम्मू :
देशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. त्यातच जम्मू काश्मीर मध्ये गेल्या चोवीस तासात 353 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 16 हजार 782 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 123 आणि काश्मीर मधील 224 जणांचा समावेश आहे. सध्या एकूण 16782 रुग्णांपैकी 7269 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 1533 आणि काश्मीरमधील 5736 जण आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 9217 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 1926 रुग्ण जम्मूतील तर 7291 जण काश्मीरमधील आहेत. तर आतापर्यंत 296 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 21 जण तर काश्मीरमधील 275 जणांनी आपला जीव गमावला आहे.
आतापर्यंत 3 लाख 47 हजार 939 नमुने नोंद करण्यात आले होते. सध्या राज्यात 42 हजार 781 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 7 हजार 269 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत.