ऑनलाईन टीम / सोलापूर :
काश्मीर खोऱ्यात सेवा बजावणाऱ्या सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावच्या सुपुत्राला वीरमरण आले. त्यांचे पार्थिव उद्या (सोमवारी) हुलजंती गावात आणण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण हुलजंती गावावर शोककळा पसरली आहे.
नागप्पा सोमण्णा म्हेत्रे (वय 34) असे या जवानाचे नाव असून, ते आठ वर्षापूर्वी लष्करात रुजू झाले होते. लॉकडाऊन काळात तीन महिने ते सुट्टीवर गावी आले होते. एक महिन्यापूर्वी ते पुन्हा सेवेत रुजू झाले. काश्मीर खोऱ्यात सेवा बजावत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना तात्काळ लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मध्यरात्री 1 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
नागप्पा यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई आणि दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले आहे.