संयुक्त पाहणी पंचनामा अहवाल जिल्हाधिकाऱयांना सादर : विलंबाबाबत कृषी अधिकाऱयांना ‘कारणे दाखवा’
प्रतिनिधी / ओरोस:
निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्हय़ातील शेतकऱयांच्या झालेल्या पिक नुकसानीचा संयुक्त पाहणी अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर झाला आहे. 299 शेतकऱयांचे 24.77 हेक्टर क्षेत्रावरील बागायत आणि फळपिकाचे मिळून 12 लाख 41 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान हा अहवाल सादर करण्यास विलंब केल्याप्रकरणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत.
दिनांक 2 व 3 जून रोजी जिल्हय़ाला चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. यामध्ये अनेक बागायतदार शेतकऱयांचे नुकसान झाले होते. 33 टक्क्यावर नुकसान झालेल्या शेतकऱयांच्या पिक नुकसानीचा ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त पाहणीचा पंचनामा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकाऱयांनी दिले होते. या अहवालाच्या नियंत्रणाची जबाबदारी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयावर सोपविण्यात आली होती.
त्यानुसार करण्यात आलेल्या पाहणीत नारळ, केळी, सुपारी व अन्य बागायती पिकांचे मिळून 5.07 हेक्टर क्षेत्रावरील 114 शेतकऱयांचे 2 लाख 54 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर आंबा व काजू या फळपिकाचे 19.70 हेक्टर क्षेत्रातील 185 शेतकऱयांचे 9 लाख 87 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान संयुक्त पंचनामा अहवाल जून महिन्याच्या दुसऱया ते तिसऱया आठवडय़ात सादर होणे अपेक्षित होता. मात्र तो जुलै महिन्यात सादर करण्यात आल्याने जिल्हाधिकाऱयांनी एकूणच कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱयांना न्याय देण्याच्या दृष्टीने दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने या विलंबाचा खुलासा करण्याचे आदेश त्यांनी जबाबदारी निश्चित करण्यात आलेल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱयांना दिले आहेत. तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱयांनी संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी यांना याची कारणे देण्याचे आदेशित केले आहे.
33 टक्यावर नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची माहिती
तालुका क्षेत्राचा प्रकार एकूण बाधित शेतकरी अपेक्षित निधी
बागायत फळपिक क्षेत्र (हे.आर.) संख्या (लाखात)
दोडामार्ग 0.00 5.01 5.01 21 2.51
सावंतवाडी 2.53 4.20 6.73 63 3.37
वैभववाडी 0.02 4.76 4.78 14 2.39
मालवण 0.00 0.00 0.00 0 0.00
कणकवली 0.00 1.52 1.52 16 0.76
देवगड 0.00 0.55 0.55 1 0.28
वेंगुर्ला 0.18 0.27 0.45 13 0.23
कुडाळ 2.34 3.39 5.73 171 2.87
एकूण 5.07 19.70 24.77 291 12.41