●श्रीराम मंदिराचा अनोखा आंनदोसत्व
●कोडोलीत उभारल्या गुढ्या
●भाजपच्या जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी उभारली गुढी
●मंत्री शंभूराज देसाई यांनी केले प्रतिमा पूजन
सातारा / प्रतिनिधी
अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर भूमिपूजन समारंभ पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्याचा आनंद सातारा शहरासह जिल्ह्यातील ठिकठिकाणी करण्यात आला.सातारा येथे कार सेवकांचा दास बोधाची प्रत देऊन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कोडोली येथे रामभक्तांनी गुढ्या उभारल्या.काहींनी घरातच रामाची आरती केली.भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी गुढी उभारून आनंद साजरा केला.राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राम प्रतिमेचे पूजन केले.
प्रभू श्रीराम मंदिरांचा भूमी पूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होत असताना सातारा जिल्ह्यात आनंदोस्तव साजरा करण्यात आला. जे कार सेवक साताऱ्यातून अयोध्येला गेले होते. त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात नाना शालगर, दत्ताजी थोरात, विठ्ठल बलशेटवार , संतोष प्रभुणे यांचा त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन राम नामाची शाल आणि दासबोधाची प्रत देऊन भाजपा आमंदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्या हस्ते व भाजपा प्रदेश कार्यकरिणी सदस्य अमित कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपा सातारा शहराध्यक्ष आणि नगरसेवक विकास गोसावी, नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेवक विजय काटवटे, सरचिटणीस प्रवीण शहाणे, जयदीप ठुसे, विक्रांत भोसले , उपाध्यक्ष अप्पा कोरे, चंदन घोडके, चिटणीस नितीन जाधव, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन साळुंखे, प्रशांत जोशी, मनीष महाडवाले, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, युवा मोर्च्या अध्यक्ष विक्रम बोराटे, ओद्योगिक आघाडी अध्यक्ष रोहित साने, अनु मोर्च्या अध्यक्ष संदीप वायदंडे, राष्ट्रीय सयंसेवक संघाचे विनय थत्ते, विजय फडके, धनंजय थोरात , श्रीधर शालगर, अतुल शालगर, भैय्या शालगर, शशांक झिटे, भूषण पिसे, भानुदास ओतरी, निकम काका आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री शंभूराज देसाई यांनी केले राम प्रतिमेचे पूजन
आज अयोध्यामध्ये प्रभू श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत असून श्रीराम मंदीराच्या भूमिपुजन शुभदिनाच्या व शुभप्रसंगाच्या निमित्ताने राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईसाहेब यांच्या शुभहस्ते दौलतनगर,(ता.पाटण) येथील गणेश मंदिरामध्ये प्रभू श्रीराम यांचे प्रतिमेचे पुजन करण्यात येवून प्रभू श्रीराम मंदीराच्या उभारणी शुभारंभाचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जालंदर पाटील,पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, ह.भ.प.दगडू माळी या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
भाजपचे जिल्हाध्यक्ष पावसकर यांनी उभारली गुढी
भाजप तसेच हिंदू एकता आंदोलन चे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सहकुटुंबीय आपल्या घरासमोर विजयाची प्रतीक असणारी गुढी उभी करून या ऐतिहासिक दिवसाचा आनंदोत्सव साजरा केला. तसेच कोडोली येथील काही राम भक्तांनी आपल्या घरासमोर गुढी उभी करून आनंद साजरा केला.