प्रतिनिधी/सातारा
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. कोयना धरणात आज 69.17 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 69.08 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 24 नवजा येथे 50 व महाबळेश्वर येथे 50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे.
धोम – 6.96 (59.56), धोम -बलकवडी- 3.31 (83.49), कण्हेर – 6.83 (71.16), उरमोडी – 8.05 (83.40), तारळी- 3.96 (67.78), निरा-देवघर 6.27 (53.44), भाटघर- 15.54(66.12), वीर – 8.20 (87.12).
गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 5.34 मि.मी. पाऊस
जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 5.34 मि.मी. पाऊस झाला आहे.
एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे
सातारा 5.64 (488.28) मि. मी., जावली – 7.62 (870.34) मि.मी. पाटण – 9.36 (825.91) मि.मी. कराड – 1.54 (385.15) मि.मी., कोरेगाव – 0.89 (331.16) मि.मी. खटाव – 0.36 (292.03) मि.मी. माण – 0.00 (264.14) मि.मी., फलटण – 0.00 (257.40) मि.मी. खंडाळा – 0.55 (293.30) मि.मी. वाई – 1.86 (471.54) मि.मी. महाबळेश्वर – 55.68 (3014.98) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 7494.24 मि.मी. तर सरासरी. 681.29 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.