बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. तसेच कोरोना मुक्ती दर ही सुधारत आहे. राज्यात गुरुवारी ६,७०६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८६,०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी राज्यात सर्वाधिक लोकांची कोरोना तपासणी करण्यात अली. यामध्ये एकूण २८,७०३ आरटी-पीसीआर आणि २७,२९६ जलद प्रतिजैविक चाचण्या घेण्यात आल्या. म्हणजेच, एकाच दिवसात एकूण ५५,९९९ रूग्णांची तपासणी करण्यात आली, जी एका दिवसातील सर्वात मोठी तपासणी संख्या आहे. बुधवारी ५३,३२६ रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. आतापर्यंत एकूण १८,८२,३१६ लोकांची तपासणी करण्यात अली आहे.