ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नौदलाच्या वरिष्ठ कमांडर्सची आजपासून तीन दिवसीय परिषद सुरू झाली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज या परिषदेला संबोधित करणार आहेत. डिपार्टमेंट ऑफ मिलिट्री अफेअर्स (DMA) आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) पदाच्या निर्मितीनंतर नौदल कमांडर्सची ही पहिली परिषद आहे.
या बैठकीत नौदलाचे प्रमुख नौदलाचे संचलन, रसद, मानव संसाधन, प्रशिक्षण आणि प्रशासकीय कामांचा वर्षभरातील स्थितीचा आढावा घेणार आहेत. या परिषदेत हिंद महासागर आणि प्रशांत महासागरतील सुरक्षाविषयक मुख्य गरजा आणि नौदलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी नौदलाच्या कार्यात्मक पुनर्रचनेबाबत चर्चा होईल.
भारत-चीनमधील वाढता संघर्ष आणि कोरोनाच्या काळात निर्माण झालेली आव्हानात्मक परिस्थिती यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे.