न्यूयॉर्क
वाढत्या वयासह सांधेदुखीचा त्रास होण्याचे प्रकारही अधिक प्रमाणात दिसून येतात. सांध्यादरम्यान गादीप्रमाणे काम करणारे कार्टिलेज संपुष्टात आल्याने सांध्याची हाडं परस्परांना धडकतात आणि ऑस्टियोआर्थरायटिस सारखी वेदनादायी समस्या सुरू होते. कार्टिलेजचे घर्षण झाल्यास किंवा ते संपुष्टात आल्यास पुन्हा निर्माण होत नसल्याचे आतापर्यंत मानले जात होते. परंतु आता स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांच्या नव्या संशोधनामुळे नवी आशा निर्माण झाली आहे.
उंदरांच्या सांध्यामध्ये नवे कार्टिलेज विकसित करण्यास यश मिळाले आहे. याकरता स्टेम सेलचा वापर करण्यात आला आहे. प्रयोगात मानवी हाड प्रत्यारोपित करण्यात आलेल्या उंदरांना सामील करण्यात आले होते. कार्टिलेज विकसित झाल्यावर उंदराचा लंगडेपणा दूर झाला आहे.