प्रतिनिधी /बेळगाव :
प्रदूषणविरहीत गणेश विसर्जन करण्यासाठी महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने फिरत्या विसर्जन वाहनांची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. सध्या कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याने फिरत्या विसर्जन संकल्पनेला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 28 वाहनांमध्ये पंधराशेहून अधिक श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बहुतांश नागरिक घरासमोरील विहिरीत किंवा तलावात घरगुती गणेशमूर्ती विसर्जित करत असल्यामुळे जलप्रदूषण होते. हे टाळण्यासाठी महापालिकेसह प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्यावतीने फिरत्या विसर्जन वाहनांची सुविधा दरवर्षी उपलब्ध करण्यात येते. मात्र, या संकल्पनेला म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. एरवी फिरत्या वाहनांमध्ये पाचशे ते सहाशे गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. मात्र यंदा कोरोना विषाणूंचा प्रसार वाढल्याने साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. शक्मयतो दीड ते पाच दिवस गणरायाची प्रति÷ापना करण्याचे आवाहन राज्य शासनाच्यावतीने करण्यात आले होते. त्याप्रमाणे दीड दिवस व पाच दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनाकरिता फिरत्या वाहनांची व्यवस्था करून श्रीमूर्ती विसर्जनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. दीड दिवसांच्या श्रीमूर्ती विसर्जनाला म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही. मात्र, पाच दिवसांच्या श्रीमूर्ती विसर्जनासाठी भाविकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कोरोनाचा प्रसार वाढला असून दररोज शेकडो नागरिकांना कोरोनाची लागण होत असल्याने विसर्जन तलावावर गर्दी करू नये. महापालिकेच्या फिरत्या वाहनामध्ये श्रीमूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पाच दिवसांच्या विसर्जनाकरिता महापालिका, बुडा, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कॅन्टोन्मेंटच्यावतीने शहर व उपनगरात 28 वाहने तैनात करण्यात आली होती. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला आहे. दरवषीच्या तुलनेत यंदा तीन पटीने वाहनांमधील हौदात शास्त्राsक्त पद्धतीने श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेच्यावतीने 10 वाहने नियुक्त करण्यात आली होती. दहा वाहनांमध्ये 700 हून अधिक श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नाझर कॅम्प, वडगाव तलावामध्ये घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. मात्र यंदा तलावात विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वडगाव परिसरातील वाहनांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याकरिता गर्दी झाली होती. वडगाव परिसरातील वाहनांमध्ये 80 हून अधिक श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. वाहनांमधील टाकी भरल्याने रामेश्वर तलावात श्रीमूर्तींचे विसर्जन करून वाहन पुन्हा थांबविण्यात येत होते. टिळकवाडी परिसरातही चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे रात्री साडेबारा वाजेपर्यंत विसर्जन सुरू होते.
उत्तर विभागात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने 12 वाहनांची सोय करण्यात आली होती. रामतीर्थनगर आणि श्रीनगर उद्यान परिसर, बॉक्साईट रोड अशा विविध ठिकाणी विसर्जनास गर्दी झाली होती. 12 वाहनांमध्ये रात्री 9 वाजेपर्यंत 580 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. बुडा आणि कॅन्टोन्मेंट बोर्डने नियुक्त केलेल्या वाहनांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पंधराशेहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.