पेडणे / प्रतिनिधी
मांदे मतदार संघातील केरी गावातील 52 वषीय संजू पराष्टेकर सदोदीत हसरा चेहरा असलेला गुणी कलावंत यांच्या निधनाने पेडणे तालुक्मयातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. संजू यांचा कोरोनाने बळी घेतल्याने त्यांच्या कुटुंबीयावर आणि नातेवाईकावर आभाळ कोसळले आहे . पूर्ण केरी गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे . संजू हा कोरोना सेंटर मध्ये तीन दिवस ठणठणीत होता मग गोवा मेडिकल हॉस्पिटल मध्ये गेल्यावरच त्याची प्रकृती चीताजनक अचानक का झाली . उपचार करण्यास डॉक्टराना अपयश का आले , असे उलट सुलट प्रश्न गावात दिवसभर चालू होते .
हा विषय संवेदनशील असल्याने कुणीही मोकळेपणाने बोलत नाही . कोरोनाची भीती दूर करण्या ऐवजी या बळी मुळे भीती अधिक वाढत आहे .
संजू याना सुरुवातीला खोकला यायचा , म्हणून त्याची कोविड चाचणी केली होती सहाव्या दिवशी त्याचा अहवाल सकारात्मक आला , तो करासवाडा येथे एका कंपनीत कामाला होता . त्याची पत्नी आरोग्य खात्यात कामाला होती . पती पत्नी दोघांचाही अहवाल सकारात्मक आला होता . पत्नीला कोरोनाची काहीच लक्षणे नव्हती म्हणून पत्नीला होम क्वारांटाईन केले .व संजू यांना पेडे म्हापसा कोरोना सेंटर मध्ये ठेवले . दुसऱया दिवशी त्याला काहीतरी होवू लागले म्हणून पत्नीने विनंती केली व पत्नीसहीत दोघानाही कांदोळी कोरोना सेंटरमध्ये पाठवण्यात आले . 30 रोजी सकाळी संजूला बरं वाटत नव्हत त्यामुळे त्याला गोवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये 146 वार्ड मध्ये उपचार चालू असताना त्याची प्राणज्योत मालवली .
संजू हे एका कंपनीत काम करत असतानाही नाटय़ कला जोपासण्याचे त्यांनी काम केले . अर्ध्या शतका पेक्षा जास्त नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत . दर्जेदार भूमिका करण्यास ते पटाईत होते . त्याच्या पश्चात्य पत्नी व 13 वर्षाची मुलगी आहे .
ड़ अखेर केरी गावातच अंत्यविधी
संजू यांचे निधन झाल्यामुळे आणि वार्ता 30 रोजी गावात कळल्यानंतर दुखाची छाया पसरली . त्यामुळे गावात त्यांचा मृतदेह आणण्यासाठी तयारी सुरु होती , मात्र काही जणांची एकमेकांकडे चर्चा झाली . गावात आणायला हरकत नव्हती मात्र हॉस्पिटलमधून त्याना निरोप आला कि मडगावला परस्पर अंत्यविधी करायचा . परत रात्री उशिरा निरोप आला कि 31 रोजी गावातच अंत्यविधी करा . त्यासाठी काही जाणकारांनी पंचायत मंडळाकडे चर्चा केली . पंचायतीने हिरवा कंदील दाखवला , काही ग्रामस्थामध्ये गैरसमज होते तेही दूर झाले .
31 रोजी दुपारी त्यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले .
केरी सरपंच सुरेश नाईक यांच्याकडे संपर्क साधला असता हा विषय संवेदनशील आहे . गावातीलच व्यक्तीचा मृत्यू झाल्याने गावात अंत्यविधी करायला कुणीही हरकत घेतलेली नाही . अंतिम दर्शनसाठी कुणाला जाता आले नाही हे दुख वाटते एका चांगल्या नाटय़ कलाकार आणि नागरिकाला मुकल्याचे त्यांनी दुख व्यक्त केले .
ड़ सामाजिक माध्यमातून श्रद्धांजली संजू हे एक उत्कृ÷ नाटय़ कलाकार म्हणून पेडणे तालुक्मयात परिचित होते . त्यांनी आतापर्यंत जीवनात शेकडो माणसे जोडण्याचे काम केले . त्याच्या निधनाची वार्ता समजताच अनेकांनी सामाजिक माधमातून संजू यांच्या निधनाबद्दल एक चांगल्या कलाकाराला मुकलो असल्याच्या भावना व्यक्त करता त्यांना श्रध्दांजली वाहिली.