बेळगाव / प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे जिल्हा आरोग्य खात्याला अडीचशे ‘फूट ऑपरेटेड सॅनिटायझर्स’ मशीन्स देण्यात आली. यापैकी 153 मशीन्स विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात, 16 दुय्यम आरोग्य केंद्रात आणि 9 हॉस्पिटल्समध्ये बसविण्यात येणार आहेत. या मशीन्सचा फायदा कोविड विरुद्ध लढणाऱया अंदाजे 5 हजार कोरोना योद्धय़ांना होणार आहे. या एकूण उपक्रमासाठी 2 लाख 37 हजार 500 रुपये खर्च आला आहे.
हा निधी विविध देणगीदारांनी दिलेल्या रकमेतून संकलित झाला आहे. रोटे. निरंजन संत, डॉ. के. एम. केळुस्कर, गणेश देशपांडे, राजू पोतदार, पराग भंडारे, सचिन सबनिस, योगेश कुलकर्णी, महेश भिरंगी, चेतन पै, मिलिंद पाटणकर, राजू विभुते, उमेश सरनोबत, अशोक पै, संतोष पाटील, मनोज मिशेल, प्रदीप कुलकर्णी, संजय कुलकर्णी, सुनिष मेत्राणी, मनोज हुईलगोळ, डॉ. सचिन माऊली, सुहास चांडक, अमित साठे या सर्व रोटरी सदस्यांनी दिलेल्या देणगीमुळे हा उपक्रम कार्यान्वित झाला.
रोटरी क्लब बेळगावचे अध्यक्ष डॉ. के. एम. केळुस्कर, सचिव गणेश देशपांडे, प्रकल्प संचालक मनोज मिशेल व क्लबचे प्रशासकीय संचालक निरंजन संत यांनी सदर मशीन्स जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ यांच्याकडे सुपूर्द केल्या.