वृत्तसंस्था/ पॅरीस
पुढील आठवडय़ाअखेर सुरू होणाऱया पेंच लीग सेकंड डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेतील सामन्याला केवळ 7000 शौकिनांना उपस्थितीसाठी परवानगी पेंच फुटबॉल लीगने दिली आहे. फ्रान्सच्या फुटबॉल संघटनेच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली.
पुढील आठवडय़ात सेकंड डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेतील ऑक्सेरी आणि क्लेरमाँट यांच्यात सामना खेळविला जाणार आहे. कोरोना महामारी समस्येमुळे फुटबॉल शौकिनांच्या उपस्थितीवर बंधन घालण्याचा निर्णय पेंच शासनाने घेतला आहे. हा सामना 12 सप्टेंबर रोजी खेळविला जाणार आहे.