शल्यचिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर यांची बदली न झाल्यास तीव्र आंदोलन करणार
माजी आमदार परशुराम उपरकर
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर यांच्यावर अनागोंदी कारभाराचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा रुग्णालयासमोर जनआक्रोश आंदोलन सुरू केले आहे आणि डॉ चाकूरकर यांची बदली न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असा इशारा मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे .
जिल्हा रुग्णालयातीकोरोना बाधीत रुग्णांना चागले जेवण मिळत नाही,स्वच्छता केली जात ,टॉयलेट ,बाथरूमला दरवाजा नाही,इमारतींना गळती आहे कोरोना चाचणी अहवाल यायच्या आता रुग्णांना सोडले जाते अशी गंभीर परिस्थिती असून याला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर जबाबदार आहेत वेगवेगळ्या खरेदी मध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला आहे त्यामुळे त्यांच्या अनागोंदी कारभारा विरोधात जनआक्रोश आंदोलन सुरू करण्यात आले आहे जो पर्यत कारभार सुधारत नाही तोपर्यंत यापुढेही आंदोलने केली जातील असे जाहीर केले
माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले आहे यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर, उपाध्यक्ष दया मेस्त्री,कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे,दीपक गावडे आदींसह बहुसंख्य मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते