नगरसेवकांनी वाटले पेढे
प्रतिनिधी/सातारा
आज सकाळी सकाळी साताऱ्यात एक सुखद बातमी धडकली आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले, बरेच वर्षे सातारा शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी नगर परिषदेच्या मार्फत हद्दवाढ प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावास मंजुरी देत मंजुरी पत्र शिवेंद्रसिंहराजे याना प्रदान केले.
ही वार्ता कळताच साताऱ्यात शिवेंद्रसिंह राजे गटातील सर्व नगरसेवकांनी मोतीचौक येथे पेढे वाटून आनंद व्यक्त केला. या प्रसंगी, न. से. जयेंद्र चव्हाण, अमित कदम, अमोल मोहिते, आदी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.