विभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शननुसार कारवाई
1लाख 18 हजार 500 रुपयांचा दंड केला वसूल
प्रतिनिधी / वाई
वाई शहरात जे नागरिक मास्क वापरत नाहीत.सोशल डिस्टनन्स पाळत नाहीत. अशा 227 नागरिकांवर वाईच्या पोलिसांनी गेल्या चार दिवसात कारवाई करून 1 लाख 18 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिली. ही कारवाई वाई शहर आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू आहे. नागरिकांनी नियम पाळावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, विभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनानुसार गेल्या चार दिवसांपासून वाई शहर व पोलीस ठाण्याच्या हद्दीत जे नागरिक मास्क वापरत नाहीत. सामाजिक अंतर पाळत नाहीत.त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक संजय मोतेवर यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, मास्क घालावा, सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी केले.