ऑनलाईन भरणाऱ्यांना जादा 1 टक्के सवलत
शहर व हद्दवाढ भागातील मिळकतदारांनी लाभ घेण्याचे उपायुक्त पांडे यांचे आवाहन
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
मिळकतदारांना शहर व हद्दवाढ भागातील चालू वर्षाच्या मिळकत कराच्या बिलावर 30 सप्टेंबरपर्यंत 5 टक्के तर ऑनलाईन कर भरणाऱ्यांना 1 टक्के जादा सवलत मिळणार आहे, तरी याचा लाभ मिळकतदारांनी घेण्याचे आवाहन उपायुक्त धनराज पांडे यांनी आवाहन केले आहे.
शहर व हद्दवाद विभागातील मिळकतदारांना यापूर्वी 1 जुलै व 1 ऑगस्ट 2020 अखेर मिळकतदारास बिल मिळो अथवा न मिळो तरी चालू मिळकत करावर 5 टक्के सवलत व ऑनलाईन भरणाऱ्यांना 1 टक्के जादा सवलत असल्याचे जाहीर केले होते. परंतू काही मिळकतदारांना पोस्टाद्वारे मिळकत कराचे बिले वेळेत पोहोचले नसल्याने पुन्हा एक संधी म्हणून 10 ते 30 सप्टेंबरपर्यंत पुन्हा सवलत जाहिर केली आहे.
ज्या मिळकतदारांना अद्याप बिल पोहोचले नाहीत, अशा मिळकतदारांनी बिले मिळो अथवा न मिळो सप्टेंबर अखेर सवलतीचा फायदा घेऊन मिळकत कराचे बिले भरुन मनपास सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त धनराज पांडे यांनी केले आहे.