सीमा लाटकर यांची बेंगळूरला बदली
प्रतिनिधी / बेळगाव
कायदा व सुव्यवस्था विभागाचे नूतन पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी सोमवारी सुत्रे स्वीकारली. तब्बल 3 वर्षे उत्तम पध्दतीने सेवा बजावलेल्या सीमा लाटकर यांची बेंगळूरला बदली झाली आहे.
डॉ. विक्रम यांनी सोमवारी सुत्रे स्वीकारली. ते मुळचे सौंदत्ती तालुक्मयातील मुनवळ्ळीचे सुपुत्र आहेत. यापूर्वी बेळगावात पशुसंगोपन खात्याचे अधिकारी म्हणूनही त्यांनी सेवा बजावली आहे. बेळगावला येण्यापूर्वी ते मंगळूर येथे सेवा बजावत होते. पोलीस आयुक्त कार्यालयातून एका पत्रकाव्दारे या संबंधीची माहिती देण्यात आली आहे.