प्रतिनिधी/ म्हापसा
राज्यात दिवसेंदिवस कोविडच्या केसेस वाढत आहेत. त्यात राज्याच्या आरोग्य मंत्री विश्वजित राणे स्टॉमओवर असे सांगत आहे. आरोग्य मंत्र्यांनी खरे बोलणे, कोविड टेस्टींग व पारदर्शकता याच्यावर भर द्यावा. गोवेकरांना भीण्याची गरज नाही असे सांगून नागरिकांचा विश्वासघात करू नका अशी माहिती ‘आप’चे प्रवक्ते राहुल म्हांब्रे यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य प्रदीप घाडी आमोणकर उपस्थित होते. पुढे बोलताना म्हांब्रे म्हणाले की, राज्यात गावोगावी मोबाईल ऍप व्हॅन करणे गरजेचे आहे तसेच यासाठी वॅबसाईट सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली. कोविड हॉस्पिटलात तसेच गोमेकॉत कोविडच्या रुग्णांसाठी किती खाता राखीव आहे हेही ऍपद्वारे स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. आज रुग्णांना जमिनीवर झोपण्याची पाळी येऊ लागली आहे. दिवसेंदिवस कोविडमुळे मरण्याच्या संख्येत वाढ होत चालली आहे. 5 जुलै 2020 साली आरोग्य मंत्र्यांनी ट्वीटरद्वारे राज्यात रुग्णवाहिकेच्या संख्येत वाढ करण्याचे स्पष्ट केले होते. मात्र अद्याप या गाडय़ा दाखल करण्यात आल्या नाही. कोविडचे रुग्ण उशीरा इस्पितळात येतात म्हणून ते मरण पावतात असे आरोग्य मंत्र्यांचे म्हणणे आहे. मृत्यूचे खापर नाहक आरोग्य मंत्र्यांनी रुग्णांच्या माथ्यावर मारू नये असे ते पुढे बोलताना म्हणाले.
कोविडच्या संख्येत वाढ होत चालली आहे. मात्र टेस्टींग कीट का वाढविण्यात आले नाही. दर दिवशी 5 हजार रुग्णांना एकाचवेळी तपासणी करता येईल इतके कीट आरोग्य मंत्र्यांनी दाखल करावेत. गावागावात कोविड टेस्टींग मोबाईल वाहन सुरू करावे अशी मागणीही यावेळी म्हांब्रे यांनी केली. याबाबत आपचे ऍल्वीस गोम्स यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन सहीनिशी सादर केले आहे. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन पुढे चाललो आहोत मात्र सध्या राज्यात ‘ग’ ची बाधा सतावीत आहे. जो तो आपण मोठा व्हायला पाहत आहे. विरोधकांनाही बरोबर घेऊन कोविडसाठी पुढे जायला पाहिजे. गोवा कोरोना विरोधात हा नारा सर्वानुमते पुढे जायला हवा. असे सांगून म्हांब्रे म्हणाले की, आरोग्य क्षेत्राला राज्यात प्रथम दर्जा द्यायला पाहिजे. राजकारण आम्ही नंतर करू असे त्यांनी सांगितले.
आपची राज्यात ऑक्सीमीटर मोहीम सुरू आहे. जे कोण खरेच गरजूवंत आहे त्यांना ऑक्सीमीटर पहिल्यांदा द्या. असे म्हांब्रे यांनी सांगितले. राज्यातील लोकांचे सरकारने मोफत टेस्ट करावी. आपची ही चाचणी घरोघरी सुरू आहे. जे कोण तापसणीसाठी जातात त्यांची कोरोना चाचणी, बॉडी टेंपरेचर, सेनिटायझेशन करूनच पाठविले जाते. म्हापशात गेल्या आठवडय़ात ऑक्सीमीट र मोहीम हाती घेण्यात आली. त्यात सुमारे 500 जणांनी स्वतःहून पुढे येऊन या मोहिमेचा लाभ घेतला.