बेंगळूर/प्रतिनिधी
उत्तर कन्नडचे भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अनंतकुमार हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला दिल्लीला गेले असता त्यांना चाचणी नंतर कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
सोमवारपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला कोरोना नियमावलीच्या चौकटीत प्रारंभ झाला. अधिवेशनात सहभागी होण्याआधी दिल्लीत खासदारांची कोरोना चाचणी करण्यात आली.
सोमवारी सुरू झालेल्या संसदेच्या अधिवेशनात भाग घेण्यासाठी अनंत कुमार हेगडे दिल्लीत दाखल झाले. त्यांच्या आगमनानंतर रुग्णालयात त्यांची कोरोना तपासणी झाली आणि त्यांनतर त्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.