आरोग्य विभागाच्या डुलक्या
ओला सुका एकाच ठिकाणी टाकला जातोय
नियमांची ऐसीतैसी
प्रतिनिधी / सातारा
सातारा शहरात दररोज तयार होणारा कचरा ओला व सुका असा वेगवेगळ्या स्वरूपात गोळा केला जात नाही. तसाच तो सोनगाव कचरा डेपोत तसाच टाकला जात आहे. कचरा विलीनीकरण करण्यासाठी करण्यात आलेल्या शेडमध्ये कचऱ्याचे ढीग लागले आहेत. पालिकेचा आरोग्य विभाग डाराडूर झाला असून त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. याच कारणामुळे सातारा पालिकेचा स्वच्छ सर्व्हेक्षणात नंबर पिछाडीवर पडला आहे.
सातारा शहरातील दररोज सुमारे सहा टन कचरा तयार होतो. तयार होणारा कचरा ओला आणि सुका असा वेगळा वेगळा गोळा करून तो सोन गाव कचरा डेपोत प्रक्रिया करण्यासाठी नेला जातो.मात्र, शहरातील कचरा हा एकत्रच गोळा केला जातो. गोळा केल्या गेलेल्या कचऱ्याचे विलीनीकरण न करता त्यावर तशीच फेकफेक केली जाते.कचरा डेपोत लाखो रुपयांचा निधी गोळा करून उभारलेले शेड ओल्या आणि सुक्या एकत्रित कचऱ्याने भरले आहे.पालिकेच्या आरोग्य विभागाला डुलक्या लागल्या आहेत. त्यामुळे शहरात गोळा करण्यात येणारा कचरा हा कसाही गोळा केला जात आहे. करारातील नियमांचे उल्लंघन होत असून त्याकडे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कारवाई शून्य असून पालिकेचा यामुळेच नंबर पिछाडीवर आला होता.