बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना बाधितांची संख्या वाढताना पहायला मिळत आहे. राज्यात कधी कोरोनाचे रुग्ण कमी तर कधी जास्त सापडत आहेत. बुधवारी राज्यात ८ हजाराहून अधिक रुग्ण सापडल्याने राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या ६ लाखाच्यावर गेली. दरम्यान कर्नाटकात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वाधिक ९४,८८६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यापैकी ८,८६६ लोक संसर्गित असल्याचे आढळले आणि यासह राज्यात संक्रमित लोकांची संख्या सहा लाखांवर गेली.
कर्नाटकात कोरोनाचे एकूण ६,०१,७६७ रुग्ण आहेत. त्यापैकी ४,८५,२६८ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. बुधवारी रुग्णालयातून ८,८९० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर राज्यात १,०७,६१६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनाने एकूण ८,८६४ रुग्ण मरण पावले आहेत. त्यापैकी बुधवारी ८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आयसीयूमध्ये ८२१ रुग्ण दाखल आहेत. राज्यात आतापर्यंत ४९ लाखाहून अधिक नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.