प्रतिनिधी/ मडगाव
‘गोंयात कोळसो नाका’ या मोहिमेला गोवा फॉरवर्ड पक्षाचा पूर्ण पाठिंबा राहणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले. आहे. सदर मोहिमेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी आमदार सरदेसाई यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सरदेसाई यांनी या कार्यकर्त्यांना व सदर मोहिमेला आपला व आपल्या पक्षाचा पाठिंबा राहणार असल्याचे आश्वासन दिले.
सागरमालाच्या अंतर्गत येणाऱया जेटी व अन्य प्रकल्पांमुळे पर्यावरणाचा ऱहास होणार असून कोळसा वाहतुकीतून गोव्याला कोणत्याही प्रकारचा फायदा नाही. गोवा पुढील पिढय़ांसाठी सुरक्षित राहावा हा या मोहिमेच्या मागील हेतू असल्याने आपल्या पक्षाचे पूर्ण सहकार्य या मोहिमेला राहील, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
आमचा नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला पहिल्यापासून विरोध होता. सागरमालाच्या अंतर्गत काय समाविष्ट आहे आणि ते गोव्यास कसे बाधक ठरेल याचे सादरीकरण ‘गेंयात कोळसो नाका’ यांच्यातर्फे तयार करण्यात आले आहे. ते आमच्या पक्षाच्या अन्य आमदारांना बुधवारी दाखविण्यात येईल. त्यानंतर स्पष्ट चित्र आमच्यासमोर उभे राहील, असे सरदेसाई यांनी सांगितले.
आम्ही विधानसभेत या विषयावरून आवाज उठविणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. म्हादई प्रश्नावर तसेच पर्यावरणदृष्टय़ा गोव्यावर अन्याय करण्यात आला असल्याची टीका करून पेंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर व मुख्यमंत्री याबाबतीत वाच्यता करत नसल्याने सरदेसाई यांनी त्यांचा समाचार घेतला व या सरकारने गोवा विकायला काढल्याचा पुनरुच्चार केला.