अत्याधुनिक सुविधा : कॉल अलर्टसह अन्य फिचर्सचा समावेश
नवी दिल्ली : सुझुकी मोटारसायकल आणि स्कूटर डिव्हीजनकडून आज भारतामध्ये एक नवीन ब्लूटय़ुथसोबतची दुचाकी सादर करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कंपनीने एका इंस्टूमेंट क्लस्टरला आता ब्लूटय़ुथ कनेक्टिविटीसोबत अपडेट करण्यात आले आहे.
कंपनीने अत्याधुनिक सुविधांच्या जोरावर आश्चर्यकारक फिचर्सही देण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीने स्कूटर ऍक्सेस 125 आणि बर्गमॅन स्ट्रीट 125 या गाडय़ांचे सादरीकरण केले आहे. नवीन तंत्रज्ञानावर आधारित मॉडेलची किंमत ही आता पहिल्यापेक्षा 3800 रुपयांनी जास्त असणार असल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे.
सदर वाहनांच्या किमती या मॉडेलनुसार बदलणार असल्याचीही माहिती असून ब्लूटय़ुथ इनेबल्ड कंसोलसोबत टीव्हीएस एनटॉर्क 125 ची किमत 68,885 रुपये ते 75,365 रुपये यादरम्यान राहणार असल्याचे म्हटले आहे.
नवीन सुविधा
नवीन कंसोल टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, कॉल ऍण्ड मेसेज अलर्ट, मिस कॉल अलर्ट आणि कॉलर आयडी, व्हॉटसअप अलर्ट, एस्टीमेटेड टाइम ऑफ अराइव्हल, ओव्हर स्पीड वॉर्निंग आणि फोन बॅटरीसह अन्य स्वरुपाची माहिती ग्राहकांना मिळणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.