प्रतिनिधी/ कुडचडे
पोंगीरव्हाळ, काकोडा-कुडचडे येथील आदित्य रत्नदीप वस्त (वय 16 वर्षे) याचा शुक्रवारी संध्याकाळी मीराबाग ते माडेल-सावर्डेला जोडणाऱया रस्त्यावर झालेल्या दुचाकीच्या स्वयंअपघातात मृत्यू झाल्याची माहिती कुडचडे पोलीस स्थानकातून देण्यात आली.
सदर घटनेचा पंचनामा निरीक्षक रवींद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक करिश्मा प्रभू यांनी केल्याची माहिती कुडचडे पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य हा दुचाकी घेऊन घरी येत असताना मीराबाग ते माडेल गावाला जोडणाऱया रस्त्यावर दुचाकीचा ताबा गेल्यामुळे हा अपघात घडलेला असण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे. आदित्य याला अंतर्गत दुखापत झाल्यामुळे व रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आदित्य हा नुकताच दहावीत उत्तीर्ण होऊन त्याने काकोडा औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात संगणक अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचे सावट पसरले आहे तसेच कुडचडे, सावर्डे परिसरातील लोकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.