बेंगळूर/प्रतिनिधी
कॉंग्रेसने यावेळी उच्चशिक्षित तरुण उमेदवार कुसुमा यांना प्रदेशातील मतदारांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उभे केले आहे. असे वक्तव्य प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केले. राजराजेश्वरी नगर विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार कुसुमा यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
यावेळी शिवकुमार यांनी कॉंग्रेस केवळ प्रदेशाच्या विकासाच्या मुद्द्यावर जनादेश मागेल, त्या प्रदेशातील अन्य पक्षांच्या उमेदवारांचा उल्लेख न करता. येथील मतदारांनी सलग दोनदा कॉंग्रेसचा उमेदवार निवडून देऊन भाजपाला धक्के दिला आहे. यावेळीही कॉंग्रेसचा विजय निश्चित आहे असे ते म्हणाले.
काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी आर. आर. नगर मतदारसंघातील मतदार नेहमीच काँग्रेसच्याबाजूने राहिले आहेत. हा विजय मुनिरत्नचा नव्हे तर कॉंग्रेसचा विजय होता. परंतु मुनिरत्न या विजयाला आपला विजय मानत भ्रमात भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी मुनिरत्न यांना मतदार योग्य ते उत्तर देतील. माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की ते अल्पसंख्याक, दलित आणि समाजातील मागासवर्गीयांचे नेते आहेत. या समुदायांचा नेता असल्याचा त्यांना अभिमान आहे. याउलट जनता दल-एस फक्त एका समाजावर लक्ष केंद्रित करून राजकारण करत आहेत.