ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 624 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 89 हजार 582 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 228 आणि काश्मीर मधील 396 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 8 हजार 088 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- 80 हजार पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 655 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 80,092 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 32,482 रुग्ण जम्मूतील तर 47,610 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1402 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 464 जण तर काश्मीरमधील 938 जणांनी आपला जीव गमावला आहे.