वृत्तसंस्था/ ओस्ट्रेव्हा
झेक प्रजासत्ताकमध्ये सुरू असलेल्या डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या खुल्या ओस्ट्राव्हा टेनिस स्पर्धेत अमेरिकेची जेनीफर ब्रॅडी आणि तृतीय मानांकित साबालेन्का यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल.
या स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात साबालेन्काने स्पेनच्या सारा टोर्मोचा 0-6, 6-4, 6-0 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. आता बेलारूसच्या साबालेन्काचा पुढील सामना अमेरिकेच्या जेनीफर ब्रॅडीशी होणार आहे. ब्रॅडीने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रशियाच्या कुडेरमटोव्हाचा 6-7 (5-7), 6-3, 6-1 असा पराभव केला. दुसऱया एका सामन्यात बेलारूसच्या चौथ्या मानांकित व्हिक्टोरिया अझारेंकाने मर्टन्सचा 6-4, 6-1, ग्रीकच्या मारिया साकेरीने टय़ुनेशियाच्या जेबुरचा 3-6, 6-3, 6-1 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.