मुंबई
खासगी क्षेत्रातील तिसऱया क्रमांकाची सर्वात मोठी बँक म्हणून कार्यरत असणाऱया ऍक्सिस बँकेचा नफा सप्टेंबर तिमाहीत 1,683 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. एक वर्षाच्या अगोदर समान तिमाहीत बँकेला 112 कोटी रुपयांचा नफा झाला होता. बँकेचे निव्वळ व्याज येणे(एनआयआय) चालू कालावधीत 20 टक्क्यांनी वधारुन 7,326 कोटी रुपयांवर राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. निव्वळ व्याजाचा आकडा हा(एनआयएम)3.58 टक्क्यांवर राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. तिमाहीच्या आधारे बँकेचा नफा हा 67 टक्क्यांनी वधारुन 2,752 कोटींवर राहिला आहे. रिटेल फीची कमाई 82 टक्क्यांनी तिमाहीच्या आधारे वाढलेली आहे. कॉर्पोरेट आणि व्यावसायिक बँकिंगची फी 46 टक्क्यांनी तिमाहीच्या आधारे आणि 10 टक्के वर्षाच्या आधारे वाढत गेल्याची माहिती आहे.