प्रतिनिधी / सोलापूर
राज्यातील फौजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी काढले आहेत. यामध्ये गुन्हे शाखेचे संजय जगताप, विजापूर नाक्याचे हेमंत शेडगे यांची पुणे ग्रामीण, तर वेल्फेअरचे अरुण फुगे सोलापूर ग्रामीण येथे बदली झाली आहे. दरम्यान, विनोद घुगे यांची पुणे ग्रामीण सुनील जाधव यांची पुणे शहर येथे बदली झाली आहे त्याचप्रमाणे केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांची पिंपरी चिंचवड, प्रमोद गाडे यांची पुणे शहर ,अश्विनी भोसले यांची सोलापूर शहरात, ग्रामीण मधील दयानंद गावडे यांची रायगड येथे बदली झाली आहे.
पोलीस निरीक्षक अशोक सावकर हे पुणे ग्रामीण येथून, गोरख गायकवाड हे गडचिरोली येथून तर जितेंद्र कोळी हे पुणे शहर येथून सोलापूर ग्रामीण दलात येत आहेत विश्वनाथ जीत हे सांगली येथून उदयसिंह पाटील हे देगाव प्रशिक्षण केंद्रातून सोलापूर शहरात येत आहे.
शहरातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे यांची कोकण स्वप्नांनी देवकते यांची गुन्हे अन्वेषण विभाग प्रकाश मासाळ यांची औरंगाबाद भिमाजी पाटील यांची नागरी हक्क संरक्षण चंद्रकांत वाबळे यांची पुणे शहर अमित शेटे यांची पुणे शहर रईस आशेक यांची नवी मुंबई संतोष माने यांची औरंगाबाद अरुण दोरकर यांची राज्य गुप्तवार्ता बिडी भुसनर यांची मसू प येथे बदली झाली आहे.ग्रामीण पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे यांची कोकण ज्योती धर्माळे यांची राज्य गुप्तवार्ता गणेश मस्के यांची नाशिक येथे बदली झाली.
तर सहाय्यक निरीक्षक विकास जाधव हे सांगली संजय परदेशी नागपूर स्वाती धपाटे राजकुमार खडके हे शहर पोलीस दलात येत आहे.
शहर पोलीस दलातील फौजदार भीमसेन जाधव यांची केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रात आणि चौगुले यांची व मसूप येथे बदली झाली आहे. भावसार बजरंग बली वाले हे ग्रामीण मधून मोतीराम मोरे हे गडचिरोली येथून सौरभ शेटे हे गोंदिया, सविता साबळे नांदेड येथून सौरभ गावडे यांची पोलीस दलात येत आहेत. तर ग्रामीण पोलीस दलातील फौजदार सुरेश नलावडे यांची मसूप विभागात बदली झाली.