वृत्तसंस्था/ नूर सुल्तान
कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या एटीपी टूरवरील अस्ताना खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा 31 वर्षीय टेनिसपटू जॉन मिलमनने एकेरीची अंतिम फेरी गाठली. आता मिलमन आणि मॅनेरिनो यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
शनिवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्य सामन्यात मिलमनने फ्रान्सच्या टिफोईचा 3-6, 6-4, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. दुसऱया उपांत्य लढतीत फ्रान्सच्या मॅनेरिनोने रूसुव्होरीचा 7-5, 6-2 असा पराभव केला. एटीपी टूरवरील पहिले विजेतेपद मिळविण्यासाठी मिलमन सज्ज झाला आहे.