हुबळी/प्रतिनिधी
राज्यात खादी उत्पादनास प्रोत्साहन न दिल्यास सरकारविरोधात आंदोलन सुरू केले जाईल असा इशारा कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मीडिया विश्लेषकांनी सरकारला दिला आहे. ते धारवाड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांतील खादी उत्पादन केंद्रांचे थकबाकीचे अनुदान त्वरित देण्यात यावे. शासकीय कर्मचार्यांनी व विद्यार्थ्यांनी आठवड्यातून एकदा खादीचे कपडे घालण्यासाठी शासनाच्या वतीने नियम लागू करावा. सरकारने खादीला प्रोत्साहन देण्यासाठी लवकर ठोस पावले उचलली नाहीत तर कॉंग्रेस पक्षाला रस्त्यावर उतरून आंदोलन करणे भाग पडेल.
निरळकेरी यांनी जर देशातील लोक स्थानिक संसाधनांचा वापर करून सुधारत असतील तर सरकारने हातमाग उद्योग आणि खादी स्टोअरच्या विकासाला महत्त्व दिले पाहिजे. भारताचा राष्ट्रीय ध्वज निर्माण करणार्या खादी केंद्राला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. खादी केंद्रांच्या विणकरांच्या कल्याणासाठी शासकीय अनुदान दिले जावे व त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी नवीन योजना आखल्या जाव्यात.
कोप्पळच्या केपीसीसी मीडिया विश्लेषक शैलजा हिरेमठ यांनी अलीकडेच आलेल्या नवीन प्रकारच्या कपड्यांनी या देशात मोठी बाजारपेठ तयार केली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ही देशी काडी उत्पादने बाजारात सापडू शकत नाहीत. खादी केंद्रांना मदत करण्यासाठी सरकारने लवकरच पुढे यायला हवे असे त्या म्हणाल्या.
यावेळी केपीसीसीच्या मीडिया विश्लेषक वीणा महंतेश, इंटकचे अध्यक्ष बंगरेश हिरेमठ, हुबळी-धारवाड महा नगर जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस मंजुनाथ भौवी, एस.ए. पवार, कागिणेले आदी उपस्थित होते.