- अर्जुन रामपालच्या कार चालक ताब्यात
ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलीवुडमधील अनेक सेलिब्रिटींची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आली आहेत. त्यानंतर एनसीबीकडून तपासणीला वेग आला आहे. एनसीबीने सोमवारी अभिनेता अर्जुन रामपाल याच्या मुंबई बांद्रातील घरी आणि कार्यालयात छापा टाकला आहे. एनसीबी सूत्रांच्या माहितीनुसार अर्जुन रामपालच्या कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान अर्जुन रामपाल याच्या घरातून एनसीबीच्या हाती काही लागले की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
एजन्सीने गेल्या महिन्यात अर्जुन रामपाल चीगर्लफ्रेंड गैब्रिएलाचा भाऊ आगिसिलाओस डेमेट्रिएड्सला ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. आगिसिलाओसकडे हशिश आणि अल्प्राजोलम सारख्या गोळ्या मिळाल्या होत्या. या दोन्हींवर मार्को नार्कोटिक्सकडून बंदी घालण्यात आलेली आहे. आगिसिलाओसचे कनेक्शन ओमेगा गोडविन नावाच्या व्यक्तीसोबत असल्याचे सांगण्यात आले होते. ज्याला मुंबईत कोकन सप्लायच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वी एनसीबीने काल चित्रपट निर्माता फिरोज नाडियालवालच्या बायकोला अटक केली आहे. फिरोज नाडियाडवाला यांच्या घरातून एनसीबीने 10 ग्रॅम गांजा, तीन मोबाईल फोन जप्त केले आहेत.