बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात यंदा पावसाने धुमाकूळ घातला. राज्यातील विविध जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यात यंदा दोन ते तीन वेळा पूर आला. पुरामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दक्षिण-पश्चिम मान्सून दरम्यान पूर आणि दरड कोसळल्यामुळे झालेल्या नुकसानीला सामोरे जाण्यासाठी केंद्रीय मदत म्हणून कर्नाटकसाठी केंद्र सरकारने शुक्रवारी ५७७.८४ कोटी रुपये देण्यास मान्यता दिली.
सरकारच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने आपत्तीनंतर तातडीने आयएमसीटीची नियुक्ती केली होती. यावेळी पूरपरिस्थितीदरम्यान केंद्रीय पथकाने पाहणी केली होती. यावर्षी उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.