प्रतिनिधी /रत्नागिरी
जिह्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असतानाच चिपळूण तालुक्यातील 16 वर्षीय मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आह़े .आतापर्यंत जिह्यामध्ये झालेल्या कोरोना मृत्यूंमध्ये सर्वात कमी वय या मुलीचे ठरले आह़े दरम्यान मुलीची तब्येत खालावल्यानंतर तिला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होत़े .अशी माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून देण्यात आली आह़े.
रविवारी कारोनाचे 39 चाचण्यांपैकी केवळ 04 रूग्ण आढळून आले आहेत़ .आरटीपीसीआर टेस्टमध्ये 02 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 02 कारोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत़ .यातील सर्व रूग्ण हे रत्नागिरी तालुक्यातील आहेत़ जिह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 8 हजार 586 इतकी झाली आह़े .तर रविवारी कोरोनापासून बरे झालेल्या 06 रूग्णांना घरी सोडण्यात आल़े यामुळे कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 8 हजार 113 वर पोहचले आह़े जिह्यातील बरे होण्याचे पमाण 94.49 इतके आह़े.
मृतांच्या तालुकानियाह आकडेवारीचा विचार करता रत्नागिरी सर्वाधिक 87, खेड 51, गुहागर 12, दापोली 32, चिपळूण 76, संगमेश्वर 33, लांजा 11, राजापूर 14 तर मंडणगडमध्ये 03 असे एकूण 319 जणांचा आतापर्यंत कारोनामुळे मृत्ये झाला आह़े .कोरोना संबंधित कोणतीही लक्षणे असल्यास वेळेत तपासणी करून घ्यावी असे अवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आह़े.
एकूण रूग्ण-8586
नवे रूग्ण -04
नवे मृत्यू -00
एकूण मृत्यू -319