ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
चार दिवसांपूर्वी आरटीओ सर्कल जवळ बेशुध्द अवस्थेत आढळून आलेल्या एका अनोळखी वृध्दाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार हा वृध्द धारवाडचा असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी धारवाड जिह्यातही ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू कले आहेत. 16 नोव्हेंबर रोजी आरटीओ सर्कल जवळ 60 वषीय वृध्द बेशुध्द अवस्थेत आढळून आला होता. त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
दुसऱया दिवशी सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. कोणत्यातरी आजाराने किंवा हृदयविकाराच्या झटक्मयाने त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय आहे. सध्या या वृध्दाचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला असून ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.