वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लीश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील बलाढय़ ओळखल्या जाणाऱया मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबला अनपेक्षित सायबर हल्ल्याने चांगलाच धक्का दिला आहे. शुक्रवारी हे वृत्त मँचेस्टर युनायटेड क्लबतर्फे प्रसिद्ध करण्यात आले.
अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आलेल्या सायबर हल्ल्याचा शोध घेण्यात येणार आहे. तूर्तास, मँचेस्टर युनायटेड क्लबच्या आयटी सुरक्षा सिस्टीमने हा सायबर हल्ला नियंत्रणामध्ये आणण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता मँचेस्टर युनायटेड क्लबने तज्ञ सल्लागाराशी संपर्क साधला आहे. मँचेस्टर युनायटेड क्लबकडून या सायबर हल्ल्याची गंभीरपणे दखल घेतली आहे. 2020-21 इंग्लिश प्रिमियर लीग फुटबॉल हंगामात मँचेस्टर युनायटेड संघ सध्या 14 व्या स्थानावर आहे. या स्पर्धेत लिसेस्टर सिटी संघापेक्षा ते आठ गुणांनी पिछाडीवर आहेत.