ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मागील 24 तासात दिल्लीत 5 हजार 246 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 99 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 45 हजार 787 वर पोहचली आहे. यामधील 38,287 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 5,361 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 4 लाख 98 हजार 780 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 8,720 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 59 लाख 76 हजार 437 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 26,080 आरटीपीसीआर टेस्ट आणि 35,698 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.
सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 8.49 % आहे. तर 4980 झोन आणि 345 कंट्रोल रूम आहेत.