ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 845 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 26 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 49 हजार 278 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल 467 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंतच्या एकूण 1,49,278 रुग्णांपैकी 1 लाख 37 हजार 089 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 710 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 31 लाख 03 हजार 006 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 7 हजार 479 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 150 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 14 जण व्हेंटिलेटरवर आहेत.