बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी प्रस्तावित नवीन विजयनगर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी व पाटबंधारे प्रकल्पांसाठी पायाभरणी केली. प्रकल्पासाठी अंदाजे २४१.३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
विजयनगर विधानसभा मतदारसंघात प्रकल्प राबविण्यात येतील यासाठी वनमंत्री आनंदसिंग यांनी प्रतिनिधित्व केले आहे. प्रकल्पाच्या प्रस्तावानुसार, तुंगभद्रा नदीतून पिण्याचे पाणी उपसून पापीनायकनाहळ्ळी व इतर दहा गावांना पुरविले जाईल. तसेच परिसरातील २३ पाण्याच्या टाक्याही भरल्या जातील.
सरकारने सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प उच्च प्राथमिकतेवर ठेवले आहेत. यावेळी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी महामारीचादेखील या विकास प्रकल्पाच्या पद्धतीवर परिणाम झाला नाही. आम्ही आमच्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतो, असेबेंगळूर येथील व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये या शुभारंभादरम्यान बोलत होते.