ऑनलाईन टीम / तेलंगणा :
प्रक्षोभक भाषण प्रकरणी एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी आणि तेलंगणाचे भाजप प्रदेश अध्यक्ष बांदी संजय यांच्याविरोधात हैदराबादच्या एसआर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसआर नगरचे पोलीस निरीक्षक सैदुलू यांनी यासंदर्भात माहिती दिली.
ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या (जीएचएमसी) निवडणूक प्रचारादरम्यान माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव आणि टीडीपीचे संस्थापक एन. टी. रामा राव यांच्या समाधीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध आयपीसीच्या कलम 505 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओवैसी यांनी 25 नोव्हेंबर रोजी हुसेन सागर तलावाजवळ राहणारे गरीब लोक काढून टाकले तर तलावाच्या काठावरील पीव्ही नरसिंह राव आणि एन टी रामा राव यांच्या समाधीही काढून टाकल्या जातील, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून वाद पेटला होता. त्यावर भाजप नेते बांदी संजय यांनी ओवैसी यांचे नाव न घेता त्यांच्यात समाधी हटवण्याची हिम्मत आहे? असा प्रश्न केला होता.