प्रतिनिधी/ निपाणी
येथील हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांच्या उरुसाची मंगळवारी अभिषेक व गोडा नैवेद्याने सांगता करण्यात आली. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उरुसकाळात गर्दी झाली नाही. केवळ गलेफ चढविणे, गंध चढविणे, अभिषेक व नैवेद्य आदी धार्मिक विधी पार पडले. उरुसकाळात मोजके फकीर व मानकरी यांची उपस्थिती होती.
चव्हाणवाडा येथून चव्हाण वारसदार पृथ्वीराज चव्हाण व मानकरी लवाजम्यासह श्री संत बाबा महाराज चव्हाण यांच्या समाधीस अभिषेक घातल्यानंतर दर्गा येथे आले. तेथे अभिषेक कार्यक्रम झाल्यानंतर चव्हाणवाडा येथे आरती व दुपारी गोडा नैवेद्य दाखवून उरुसाची सांगता झाली. यावेळी उरुस उत्सव कमिटी चेअरमन व नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, रणजीत देसाई, संग्राम देसाई, विवेक मोकाशी, माजी सभापती नाज मुजावर, बंडा गंथडे, दत्तात्रय पोतदार, शामराव कांबळे, पिसे, रावळ, बुडके, लाड, बडवे, दैव, बंजारे, बंडा येरुडकर, साळी, कोष्टी, समाज बांधव उपस्थित होते.