क्रूझरच्या अपघातात एक ठार, सहा जण जखमी : सर्वजण धारवाडहून निघालेले पर्यटक
वार्ताहर/ रामनगर
गोवा-बेळगाव महामार्गावरील तिनईघाट येथील नव्याने बांधण्यात येत असलेल्या टोकनाक्यापाशी हेबळ्ळी (ता. धारवाड) येथून गोवा पर्यटनासाठी प्रुझरमधून 10 पर्यटक जात होते. तर तिनईघाट टोलनाक्याजवळ अचानक समोर रस्ता नसल्याने सदर प्रुझर तीनवेळा कलंडून अपघात झाला. या अपघातात एक ठार तर सहा जण जखमी झाले. हा अपघात रविवारी पहाटे चारच्या सुमारास घडला.
मोहम्मद शाहील बाबाजान सौतूर (वय 24) असे अपघातात जागीच ठार झालेलचे नाव आहे. तर लक्कप्पा फकिरप्पा जवळी (वय 24, रा. वनहळी), महंतेश अर्जुन दुरीनवर (वय 30, रा. हेब्बळी), विजय भिमाप्पा कुडेकार (वय 22, हेब्बळी), नितेश कलप्पा कोंडीकोप (वय, 22), बसवराज अडव्याप्पा कुरी (वय 22), बसवराज निंगाप्पा भोमण्णावर (वय 22) हे जखमी झाल्याने त्यांना केएलई इस्पितळ बेळगाव येथे दाखल करण्यात आले. घटना समजताच जोयडा पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब हुलमण्णावर व रामनगर उपनिरीक्षिका मंजुळा रावजी व किरण पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
सदर महामार्ग गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने अर्धवट स्थितीतच असल्याने या मार्गावर सतत अपघात होतच असतात. या मार्गासाठी न्यायालयात तक्रार असल्याने आजवर तारीखच मिळत आहे. आता 27 नोव्हेंबरची तारीख दिली होती.
यानंतर दि. 1 डिसेंबर देण्यात आली व यानंतर 3 डिसेंबर ही तारीख मिळाली व 3 डिसेंबरला प्रथमच न्यायालयात चर्चा करण्यात आली व पुन्हा 7 डिसेंबर ही तारीख दिली. आजच्या दिवशी तोडगा निघण्याची संभावना वर्तविण्यात येत आहे. परंतु काम बंद असल्याने सदर काम घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीचे 80 टक्केहून अधिक कर्मचारी अन्य ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. यामुळे हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होईल ही आशाच मावळली आहे..