वार्ताहर / कराड
अहमदनगर जिह्यातील कर्जत नगरपंचायतीच्या अधिकारी, कर्मचाऱयांच्या पथकाने कराड नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास रविवारी भेट देऊन पाहणी केली.
कर्जतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, उपअभियंता आर. डी. भालदार, ए. आर. पवार, मिलिंद शिंदे, मारूती काटरे, वैभव पाटील, सर्व आरोग्य व ड्रेनेज विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सांडपाणी प्रक्रिया केंद्रातही त्यांनी भेट देऊन माहिती घेतली. कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सलग दोन वर्षे देश पातळीवर प्रथम क्रमांक मिळवला आहे. घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रियेत मोठे काम केले आहे. त्यामुळे राज्यातील नगरपालिका पथदर्शी शहर म्हणून कराडला भेट देऊन येथील विविध प्रकल्पांची पाहणी करत आहेत.