लाईव्ह व्हिडीयोचा वापर 60 टक्के वाढला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सेशल मीडियातील दिग्गज प्लॅटफॉर्म म्हणून गणना होणाऱया फेसबुकचा आणि त्यासोबत मॅसेंजर या ऍपचा वापर कोरोनाच्या कालावधीत सर्वाधिक झाल्याची माहिती आहे. यामध्ये भारतासोबत जगभरात लाईव्ह व्हिडीयोचा वापर सर्वाधिक झाल्याची नोंद आहे.
कोरोना महामारीच्या दरम्यान एक दुसऱयांच्या संपर्कात राहण्यासाठी संवादाचे माध्यम म्हणून ग्राहकांनी या साधनांच्या वापरावर अधिक भर दिल्याचे फेसबुक इंडियाचे संचालक आणि हेड ऑफ पार्टनरशिप मनीष चोपडा यांनी इंडियन मोबाईल काँग्रेस 2020 मध्ये बोलताना स्पष्ट केले आहे.
जागतिक पातळीवर मॅसेंजिंगमध्ये आलेल्या लाईव्ह व्हिडीयो पाहण्यातील वाढ आणि दुसऱया बाजूला इंस्टाग्राममधील क्रिएटीव्ह पोस्टच्या व्हिडीयोचा हिस्सा हा एक तृतीयांश राहिल्याची माहिती आहे. यासोबत फेसबुकसाठी ‘भारत’ ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. यांच्या व्यतिरिक्त कंपनीने फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम आणि मॅसेंजिंग ऍप व्हॉटसऍप याचाही सहभाग महत्वाचा असल्याचे दाखवून दिले आहे. सध्याला एकंदर फेसबुकची जागतिक स्तरावरील दररोजची ग्राहकसंख्या 2.5 अब्ज इतकी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.