नोव्हेंबरमधील क्षमता 100 टक्क्यांवर : उद्योग क्षेत्राच्या तेजीचा परिणाम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात मिळत गेलेल्या सरकारच्या शिथिलतेम्gळे आता आर्थिक घडामोडींसह उद्योग क्षेत्राला तेजी प्राप्त झाली आहे. याचा परिणाम म्हणून देशातील इंधन मागणी पूर्वपदावर आल्याचे पहावयास मिळाले आहे.
याचा एक भाग म्हणून ऑईल आणि गॅस क्षेत्रात कार्यरत असणारी सरकारी कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) यांच्या रिफायनरीमध्ये कच्च्या तेलाची क्षमता वाढली असून नोव्हेंबर महिन्यात ही क्षमता 100 टक्के करण्यात आली आहे. याच्या अगोदर ऑक्टोबरमध्ये हा आकडा 88 टक्के आणि मागील वर्षात समान कालावधीत हा टक्का 99 टक्क्यांच्या घरात असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
कोरोनाचा प्रभाव ओसरत असून आता भारतीय अर्थव्यवस्था तेजी प्राप्त करत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. यामध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीने तेजीचा सूर पकडला आहे. यामुळे आयओसीने नोव्हेंबरमध्ये रिफायनरीमध्ये कच्च्या तेलाची क्षमता ही मागील सहा महिन्यांच्या तुलनेत उच्चांकी पातळीवर पोहोचवली आहे. हा आकडा चालू वर्षातील मे महिन्यात 55 टक्क्यांवर राहिल्याची नोंद केली आहे.
डिझेल-जेट इंधनाची मागणी तेजीत
मासिक पातळीवर निरिक्षणे पाहिल्यास डिझेलची मागणी ही 20 टक्क्यांनी वधारली आहे, तर वर्षाच्या आधारे हा टक्का 9 टक्क्यांच्या खाली राहिल्याची माहिती आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत जेट फ्tयलची मागणी 4 टक्क्यांनी वधारली आहे.
परंतु वर्षाच्या पातळीवर यामध्ये मात्र 45 टक्क्यांची घसरण नोंदवली असल्याची माहिती आहे.