ग्रा. पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली परेड
प्रतिनिधी / बेळगाव
22 डिसेंबर रोजी होणाऱया ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बेळगाव पोलिसांनी काळय़ा यादीतील गुन्हेगारांची परेड घेतली. निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडला तर याद राखा, अशा शब्दात अधिकाऱयांनी त्यांना तंबी दिली आहे.
बेळगाव ग्रामीण, हिरेबागेवाडी, काकती पोलीस स्थानकात बुधवारी ही परेड झाली. बेळगाव ग्रामीणचे एसीपी गणपती गुडाजी, पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर, पोलीस उपनिरीक्षक आनंद आदगोंडा आदी अधिकाऱयांनी ही परेड घेतली. काळय़ा यादीतील गुन्हेगारांना अधिकाऱयांनी तंबी दिली.
हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर, काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर यांनीही आपल्या पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांची परेड घेऊन निवडणुकीच्या काळात अप्रिय घटनांना थारा दिलात तर याद राखा, अशा शब्दात त्यांना तंबी देण्यात आली आहे.