प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यातील खासगी सावकारांवर शुक्रवारी सहकार विभागाने धाडी टाकल्या, कोल्हापूर शहर, हातकणंगले, शिरोळ, राधानगरी तालुक्यातील 9 सावकारांच्या घर, फार्म हाऊस, कार्यालयावर विविध पथकांनी एकाच वेळी कारवाई केली. यामध्ये कोरे धनादेश, स्टँप, खरेदी पत्र आदी संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली. सोमवारपासून कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
दरम्यान यंदाच्या वर्षभरात ही चौथी कारवाई आहे. यापूर्वी 27 खासगी सावकारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यापैकी 12 सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यंदाच्या वर्षभरात 37 सावकारांवर सहकार विभागाने कारवाई केली आहे.
खासगी सावकारांच्या विरोधात जिल्हÎातून तक्रारी दाखल झाल्या होत्या. प्राप्त तक्रारींची खातरजमा करुन शुक्रवारी धाडी टाकण्यात आल्या. यासाठी सहकार अधिकाऱयांची 9 पथके तयार करण्यात आली होती. यामध्ये 51 कर्मचारी 1 पोलीस अधिकारी 19 पोलीस कर्मचाऱयाचा समावेश होता. सकाळीच पथकांना कारवाईच्या ठिकाणी पाठवण्यात आले. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी संदेश दिल्यानंतर कारवाईस प्रारंभ झाला. यामध्ये शिरोळ तालुक्यातील 5, हातकणंगले तालुक्यातील 2, तर राधानगरी तालुका व कोल्हापूर शहरातील एका सावकाराचा समावेश आहे. उमेश हिंदुराव काशिद (बुधवार पेठ, कोल्हापूर शहर), संजय श्रीपती भांदिगरे (पुंगाव ता. राधानगरी), दीपक बाळू खोत (खोतवाडी ता. हातकणंगले) या तीन सावकारांकडे आक्षेपार्ह काही सापडलेले नाही. तर अन्य सहा ठिकाणी दस्ताऐवज मिळून आले आहेत. रमेश आनंदराव कुंभार जयसिंगपूर याच्याकडे 20 कोरे चेक, सहÎा असलेली डायरी, 4 कोरे स्टँम्प, गाडीची कागदपत्रे तर जयसिंगपूर येथीलच रमेश तुकाराम पडियार याच्याकडे 3 करारपत्रे, दुचाकीचे आरसीबुक, 1 कोरा स्टँप, 3 कोरे धनादेश मिळून आले. हारोली तालुका शिरोळ येथील रोहित पाटील याच्याकडे सर्वाधिक 52 कोरे धनादेश व 40 स्टँप मिळून आले. श्रीधर अर्जुन गुरव जयसिंगपूर याच्याकडे आर्थिक नोंदीची तीन रजिस्टर व तक्रारदारची सही असलेला एक कोरा धनादेश सापडून आला. अनुप पाटील (धरणगुत्ती, ता. शिरोळ) याच्याकडे भिशी नोंद वही, 15 कोरे चेक, उसनवार पावत्या, आक्षेपार्ह नोंदी, गाडÎांची कागदपत्रे सापडली आहेत. शिवगोंडा सिद्धगोंडा पाटील (खोतवाडी ता. हातकणंगले) याच्याकडे कोरे चेक, खरेदी दस्त, डायरी मिळून आले.
उपनिबंधक पी. एल. जगताप, सहाय्यक निबंधक सुजय येजरे, प्रेमदास राठोड, बाळासाहेब पाटील, नारायण परजणे, सहकार अधिकारी नतिन माने, ऐ. पी. खामकर, के. एस. ठाकरे, आर. जे. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोहीम पूर्ण केली.
निर्भयपणे तक्रार करा
खासगी सावकारीची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी सहकार विभागाने पाऊस उचलले आहे. अन्याय पिळवणूक होत असेल तर निर्भयपणे तक्रार करा नावाची गोपनियता पाळली जाईल.
अमर शिंदे,
जिल्हा उपनिबंधक