दिवसात 4 लाख नवे रुग्ण
अमेरिकेत लसीकरण सुरू होऊनही कोरोना महामारीमुळे स्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. अमेरिकेत मागील 24 तासांमध्ये 4 लाखांहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. यादरम्यान 2500 पेक्षा अधिक जणांचा मृत्यूही झाला आहे.
युएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (सीडीसी) स्वतःच्या आकडेवारीत मागील 24 तासांमध्ये 4 लाखाहून अधिक नव्या रुग्णांची भर टाकली आहे. देशातील सर्व प्रांतांमध्ये एकूण 4 लाख 3 हजार 359 नवे रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेत यापूर्वी सर्वाधिक रुग्ण 11 डिसेंबर रोजी आढळून आले होते. 11 डिसेंबर रोजी 2 लाख 44 हजार 11 रुग्ण सापडले होते. तर मागील 24 तासांत देशात 2756 जणांचा मृत्यू ओढवला आहे.
अमेरिकेत कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला आहे, परंतु तेथे कोरोना महामारीचा कहरही वेगाने वाढत आहे. तेथील तुरुंगांमध्ये कैद प्रत्येक पाचवा कैदी कोरोनाने संक्रमित झाला आहे. कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेला तोंड देणाऱया अमेरिकेत 4 नोव्हेंबरपासून प्रतिदिन 1 लाखांहून अधिक बाधित सापडत आहेत. सर्वाधिक रुग्ण कॅलिफोर्निया, टेक्सास आणि फ्लोरिडात आढळून येत आहेत.
अमेरिका
कोरोना दिलासा निधी अंतर्गत 900 अब्ज डॉलर्स (सुमारे 44 लाख कोटी रुपये) देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सिनेटमध्ये याला मंजुरी मिळणार आहे. 600 डॉलर्स प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात थेट जमा करण्याची अमेरिकेच्या संसदेची योजना आहे. तर दर आठवडय़ाला 300 डॉलर्स बेरोजगारी भत्त्याच्या स्वरुपात दिले जाणार आहेत.