बरे होण्याचे प्रमाण 96.57 टक्के
प्रतिनिधी / पणजी
राज्यात गुरूवारी कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला. त्याद्वारे बळींची संख्या 728 वर पोहोचली आहे. गत 24 तासात 90 नवे रुग्ण सापडले तर 88 जण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.57 टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या 1001 सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत एकूण 50454 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 48725 जण बरे झाले. संशयित रुग्ण म्हणून 19 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले आहे. 62 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे : डिचोली 12, सांखळी 21, पेडणे 20, वाळपई 06, म्हापसा 30, पणजी 68, हळदोणा 12, बेतकी 14, कांदोळी 43, कासारवर्णे 02, कोलवाळ 13, खोर्ली 27, चिंबल 38, शिवोली 36, पर्वरी 61, मये 03, कुडचडे 31, काणकोण 23, मडगाव 104, वास्को 47, बाळ्ळी 15, कासावली 32, चिंचिणी 14, कुठ्ठाळी 28, कुडतरी 31, लोटली 38, मडकई 17, केपे 61, सांगे 23, शिरोडा 34, धारबांदोडा 06, फोंडा 66, नावेली 24. त्याशिवाय हवाईमार्गे आलेला 01 बाधित सापडला आहे.
24 डिसेंबरपर्यंचे एकूण रुग्ण 50454
24 डिसेंबरपर्यंचे बरे झालेले रुग्ण 48725
24 डिसेंबरपर्यंचे सक्रिय रुग्ण 1001
24 डिसेंबर रोजीचे नवे रुग्ण 90
24 डिसेंबर रोजी बरे झालेले रुग्ण 88
24 डिसेंबर रोजीचा बळी 01
आतापर्यंतचे एकूण बळी 728